दोहा – फिफा विश्वकरंडक ( FIFA World Cup ) फुटबॉल स्पर्धा कतारमध्ये सुरू आहे. मंगळवारी अर्जेन्टिना व सौदी अरेबिया यांच्यातील सामना संपल्यावर तेथे उपस्थित असलेल्या जपानच्या फुटबॉल चाहत्यांनी केलेल्या एका कृतीचे आता जगभरात कौतुक होत आहे. त्यांच्या देशाचा सामना नसतानाही या जपानी चाहत्यांनी सामना संपल्यावर चक्क स्टेडियमची साफसफाई केली. आम्ही जपानी लोक कचरा मागे ठेवत नाही, असे उत्तर अत्यंत अभिमानाने त्यांनी दिले व त्यांना जगभरातून सलाम केला गेला.
#FIFAWorldCup2022 : जपानकडून जर्मनीचे गर्वहरण; पिछाडीवरून थाटात पुनरागमन करत मिळवला विजय
याच जपानी चाहत्यांनी 2018 साली आपल्या संघाचा पराभव झाल्यावर आलेल्या निराशेनंतरही त्या मैदानात असलेला कचरा साफ केला होता. आता चार वर्षांनी त्यांनी कतारमध्ये तोच कित्ता गिरवला. स्टेडियमच्या प्रत्येक रांगेत पडलेल्या प्लास्टिकच्या बाटल्या, पेपर कप तसेच अन्न पदार्थांची फेकलेली पाकीटे व अन्य कचरा गोळा केला. त्याची योग्य ठिकाणी विल्हेवाट लावली. कोणतीही अपेक्षा न करता केकेली ही कृती जागतिक स्तरावर दाद मिळवून देणारी ठरली.