नवी दिल्ली : भारतीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे जगातील सर्वोत्तम संरक्षण मंत्र्यांपैकी एक आहेत, असे कौतूक जपानचे संरक्षणमंत्री तारो कोनो यांनी केले. याब कौतुकाचे ट्विट त्यांनी केले आहे.
सिंह यांचे ट्विटरवर एक कोटी 50 लाख फॉलोअर्स आहेत. तर कोनो यांच्या फॉलोअर्सची संख्या 12 लाख आहे. या कौतुकाबद्दल सिंह यांनी कोनो यांचे आभार मानले आहेत. भारत आणि जपान यांच्यात संरक्षण क्षेत्रात खूप जवळीक आहे. या दोन्ही देशांत विशेष सामरिक भागिदारी करार करण्याच्या दृष्टीने नोव्हेंबर महिन्यात बैठक झाली होती.
भारतीय शिष्टमंडळात संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांचा समावेश होता. तरच जपानच्या शिष्टमंडळात परराष्ट्र मंत्री तोशमित्सू मोटेगी आणि कोनो यांचा समावेश होता. जपानच्या संरक्षणमंत्र्यांनी केलेल्या कैतुकाबद्दल सिंह यांनी त्यांचे आभार मानले आहेत.