जपान खुली बॅडमिंटन स्पर्धा : साईप्रणीत उपांत्य फेरीत

टोकियो – जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत विजेतेपद मिळविण्याचे पी.व्ही.सिंधू हिचे स्वप्न संपुष्टात आले असले तरी दुसरीकडे भारताच्या बी.साईप्रणीतने मात्र सातत्यपूर्ण खेळाचा प्रत्यय घडवित उपांत्य फेरीकडे वाटचाल केली आहे. साईप्रणीतने इंडोनेशियन खेळाडू टॉमी सुगियार्तो याच्यावर 21-12, 21-15 असा केवळ 36 मिनिटांमध्ये विजय मिळविला.

साईप्रणीतने सफाईदार खेळाचा प्रत्यय घडविला. त्याने पहिल्या गेममध्ये परतीच्या खणखणीत फटक्‍यांचा अप्रतिम खेळ केला. तसेच त्याने सर्व्हिसवरही चांगले नियंत्रण ठेवले होते. दुसऱ्या गेममध्ये त्याने सुरुवातीपासून खेळावर नियंत्रण मिळविले. सुगियार्तोने त्याला चिवट लढत दिली. मात्र, साईप्रणीतची आघाडी मोडून काढण्यात त्याला अपयश आले.

साईप्रणीतने स्मॅशिंगच्या खणखणीत फटक्‍यांचा उपयोग करीत ही गेम घेत विजय मिळविला. त्याची उपांत्य फेरीत अग्रमानांकित केन्तो मोमोता या स्थानिक खेळाडूशी गाठ पडणार आहे.

 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.