जपान खुली बॅडमिंटन स्पर्धा : पी.व्ही.सिंधू उपांत्यपूर्व फेरीत

टोकियो – भारताच्या आव्हानाची धुरा सांभाळत पी.व्ही.सिंधू व बी. साईप्रणीत यांनी जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेतील उपांत्यपूर्व फेरीच्या दिशेने वाटचाल केली. मात्र, भारताच्या एच.एस.प्रणोयचे आव्हान संपुष्टात आले.

ऑलिंपिक रौप्यपदक विजेती खेळाडू सिंधूने स्थानिक खेळाडू एया ओहारी हिचा 11-21, 21-10, 21-13 असा पराभव केला. पहिल्या गेममध्ये तिला स्मॅशिंगच्या फटक्‍यांवर नियंत्रण ठेवता आले नाही. तिच्याकडून झालेल्या अक्षम्य चुकांचा फायदा घेत ओहारीने ही गेम घेतली. मात्र, दुसऱ्या गेमपासून सिंधूने ड्रॉपशॉट्‌स व नेटजवळून प्लेसिंग असा खेळ करीत सामन्याचे पारडे आपल्या बाजूने झुकविले. उर्वरित दोन्ही गेम्समध्ये तिने केलेल्या आक्रमक खेळापुढे ओहारीचा बचाव निष्प्रभ ठरला. तिला येथे पाचवे मानांकन मिळाले आहे.

तर दुसरीकडे भारताच्या सात्विकसाईराज रान्किरेड्डी व चिराग शेट्टी यांनी अपराजित्व राखताना चीनच्या काई झियांग हुआंग व चेंग युली यांचा 15-21, 21-11, 21-19 असा पराभव केला. उपांत्यपूर्व फेरीत त्यांना द्वितीय मानांकित ताकेशी कामुरा व केईगो सोनोदा यांच्याशी झुंजावे लागणार आहे.

रान्किरेड्डी व अश्‍विनी पोनप्पा यांना मिश्रदुहेरीत पराभूत व्हावे लागले. त्यांना थायलंडच्या डेचापोल पुवारानाकोह व सॅसिरी तेरानाचाई यांनी 21-16, 21-17 असे हरविले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.