जपानमध्ये करोना काळातही ऑलिम्पिकचे आयोजन शक्‍य

टोकियोचे गर्व्हनर युरिको कोइके यांनी व्यक्‍त केला विश्‍वास

टोकियो  – जपानमध्ये करोनाचा संसर्ग वाढत असला तरी पुढील वर्षी होणाऱ्या ऑलिम्पिकचे आयोजन सुरक्षितपणे घेण्यास सक्षम आहे, असा ठाम विश्‍वास टोकियोचे गर्व्हनर युरिको कोइके यांनी व्यक्‍त केला आहे. यजमान शहर म्हणून जे-जे काही खेळ होतील, ते साध्य करण्याचा सरकारचा निर्धार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

टोकियो येथील आयोजीत एका पत्रकार परिषदेत कोइके बोलत होते. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष थॉमस बाख यांच्या टोकियो दौऱ्यानंतर त्यांनी आठवडाभरानंतर हा निर्धार व्यक्त केला आहे.

युरिको कोइके म्हणाले, सरकारने सर्व देशभर अर्थव्यवस्थेला इजा न पोहोचवता करोना प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि व्यवसायाच्या कामकाजात संतुलन साधण्याचा प्रयत्न केला आहे. जपानी लोकांमध्ये मुखवटाचा व्यापक वापर हा एक प्रभावी उपाय आहे. ज्याने युनायटेड स्टेट्‌स आणि युरोपमध्ये मोठ्या प्रमाणात होणा-या संक्रमणापासून जपानला वाचवले आहे. तसेच अनेक जपानी लोकांनी करोना प्रतिबंधक प्रयत्नांमध्ये त्यांचा नैतिक कर्तव्य म्हणून उपयोग केला, असेही त्यांनी सांगितले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.