नवी दिल्ली – भारतीय नौदलातर्फे आयोजित, भारत आणि जपान यांच्यातील सागरी सरावाच्या सहाव्या सत्राला बंगालच्या उपसागरात आजपासून सुरूवात झाली. जपान सागरी स्वसंरक्षण दलाच्या जहाजांचे नेतृत्व, रियर ऍडमिरल हिराता तोशियुकी, कमांडर एस्कॉर्ट फ्लोटिला फोर करत आहेत तर भारतीय नौदलाच्या जहाजांचे नेतृत्व, नौदलाच्या पूर्व ताफ्याचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग, रियर ऍडमिरल संजय भल्ला करत आहेत.
“जेएमएसडीएफ’च्या इझुमोचे या हेलिकॉप्टर वाहक जहाजाचे आणि ताकानामी या मार्गदर्शित क्षेपणास्त्र विनाशिकेचे बंगालच्या उपसागरात आगमन झाल्यानंतर भारतीय नौदलाच्या जहाजांनी त्यांचे स्वागत केले. स्वदेशी बनावटीच्या तीन भारतीय युद्धनौका या सरावात सहभागी होत असून त्यात सह्याद्री या रोल स्टेल्थ युद्धनौकेसह कडमॅट आणि कवरत्ती या पाणबुडी रोधक युद्धनौकांचा समावेश आहे.
त्याशिवाय रणविजय हे मार्गदर्शित क्षेपणास्त्र विनाशक, ज्योती हा फ्लीट टॅंकर, सुकन्या ही सागरी गस्ती नौका, पाणबुड्या, मिग 29 के लढाऊ विमान, लांब पल्ल्याचे सागरी गस्ती विमान तसेच जहाजावरील हेलिकॉप्टर्ससुद्धा या सरावात सहभागी होणार आहेत. या सरावात सागरी युद्ध सराव आणि विशाखापट्टणम येथील बंदरावरील सराव अशा दोन टप्प्यांमध्ये सराव होणार आहे.