मुंबई – बॉलिवूड दिग्दर्शक बोनी कपूर आणि श्रीदेवी यांची मुलगी जान्हवी हिने ‘धडक’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केल आहे. या चित्रपटानंतर तिची बऱ्याच चित्रपटांमध्ये वर्णी लागली आहे. आता बोनी कपूरच्या आगामी बॉम्बे गर्ल या चित्रपटात जान्हवी मुख्य भूमिका साकारणार आहे.
IT’S OFFICIAL… Boney Kapoor and Janhvi Kapoor team up for a movie for the first time… Titled #BombayGirl…. Coming of age story of a rebellious teenager… Directed by Ssanjay Tripaathy… Boney will produce the film with Mahaveer Jain.
— taran adarsh (@taran_adarsh) October 7, 2019
चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी याबाबतची माहिती सोशल मीडियावर शेअर केली आहे. बोनी कपूर यांच्या आगामी चित्रपटाचं नाव ‘बॉम्बे गर्ल’ असं राहणार आहे. संजय त्रिपाठी हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. तर, बोनी कपूर आणि महावीर जैन हे या चित्रपटाची निर्मिती करतील.
या चित्रपटाशिवाय जान्हवी करण जोहरच्या ‘तख्त’ चित्रपटातही भूमिका साकारणार आहे. तसच, ‘कारगिल गर्ल’मध्ये ती गुंजन सक्सेना यांच्या भूमिकेत दिसणार आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचे काही पोस्टरही तिने सोशल मीडियावर शेअर केले होते. कार्तिक आर्यनसोबतही ‘दोस्ताना’ च्या सिक्वेलमध्ये झळकणार आहे.