जगात आणि देशात कोरोनाने शिरकाव केल्यानंतर नागरिकांमध्ये चांगलीच भीती निर्माण झाली. आपल्याला कोरोनाची लागण होऊ नये म्हणून अनेकांनी घराबाहेर निघणेही बंद केले.त्यामुळे अनेक भागात अनेकांना मदतही मिळत नव्हती अशा गंभीर काळात हडपसर भागात नगरसेवक प्रमोद नाना भानगिरे यांनी आपणही समाजाचे काही देणे लागतो या भावनेतून स्वतः चा प्रभाग असो की हडपसर विधानसभा मतदारसंघ नेहमी अडचणीत असलेल्या नागरिकांसाठी नेहमीच मदतीचा हात दिला आहे. त्याची अनेक उदाहरणे आहेत.
आज देशावर करोना महामारीचे संकट आले आहे. अशा परिस्थितीतही समाजासाठी देणे लागतो, या भावनेतून नगरसेवक नाना भानगिरे यांनी मोफत घरपोच जेवण, धान्य- भाजीपाला, सॅनिटायझर, मास्क,पीपीई किट वाटप, रक्तदान शिबिरे, दरम्यानच्या काळात जळीतग्रस्त व पावसात पडझड झालेल्या काही कुटुंबांना रोख रक्कम स्वरूपात मदत केली असून आता स्वतः चे हॉटेल देऊन नगरसेवक प्रमोदनाना भानगिरे यांनी एक जनसेवक म्हणून दातृत्व जपले आहे. त्यांच्या या कार्याचे सर्वंच स्तरांतून कौतुक केले जाते आहे.
पुणे शहरात सर्वत्र करोना पेशंट ची संख्या जोरात वाढत आहे, त्यामुळे महंमदवाडी प्रभाग क्रमांक 26 मधील कोरोना पेशंटसाठी शिवसेना नगरसेवक प्रमोदनाना भानगिरे यांनी स्वतः चे हॉटेल व लॉज उपलब्ध करून दिले. ह्या ठिकाणी पॉझिटिव्ह पेशंट वरील उपचारांची व्यवस्था करण्यात येणार आहे. अशा प्रकारे स्वतःची वास्तू उपलब्ध करून देऊन नानांनी एक नवीन आदर्श घालून दिला आहे.
गेले कित्येक दिवस कोरोना या रोगावर मात करण्यासाठी सतत नाना भानगिरे यांनी मास्क, सॅनिटायझर, गरीब गरजूंना धान्य वाटप, पोलीस अधिकारी, डॉक्टर, मेडिकल कर्मचारी, साफ सफाई कर्मचारी, महानगरपालिका अधिकारी यांना पी पी ई किट चे वाटप केले. कोरोना पॉझिटिव्ह पेशंटचे स्वाब टेस्टिंग साठी विशेष प्रयत्न केले.
तसेच ज्या रुग्णाचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत त्यांना रुग्णालयात भरती करून पूर्ण पणे उपचार होई पर्यंत काळजी घेतली आहे. अशा सर्व सेवा नगरसेवक प्रमोदनाना भानगिरे यांनी उपलब्ध करून दिल्या. करोना चे वाढते प्रमाण रोखण्यासाठी, जागोजागी मोफत सर्दी, खोकला, ताप या आजारावर तज्ञ डॉक्टर यांचे कॅम्प आयोजित करून नागरिकांना मोफत उपचार करून दिले. तसेच प्रत्येक सोसायटी मध्ये सॅनिटायझर मशीन, चौकाचौकात हात धुवायचे मशीन उपलब्ध करून दिले. प्रत्येक सोसायटी व बैठी घराच्या भागामध्ये औषध फवारणी करून कोरोना पासून आपल्या नागरिकांना कसे सुरक्षित करता येईल याचा प्रयत्न केला आहे.
अशा प्रकारे कित्येक दिवस नागरिकांची सेवा करता करत असताना नानांना स्वतःला कोरोना झाला. पण जनतेच्या प्रेमाने आणि आशीर्वादाने नानांनी ह्या करोना वर मात केली आणि आता ते ठणठणीत बरे झाले आहेत. या वेळी त्यांच्या वर उपचार करणारे डॉक्टर, नर्स, नोबल हॉस्पिटल मधील सर्व स्टाफ यांचे त्यांनी आभार मानले.
काळजी घ्या , सुरक्षित रहा, प्रशासनाला सहकार्य करा !
कोरोना महामारीत सर्वांना मदतीचा हात देणारे नगरसेवक स्वतः कोरोना पॉझिटिव्ह झाले आणि बरेही झाले यावर बोलताना नाना सांगतात की करोना ह्या रोगाला कुणीही घाबरून जाऊ नये ,तसेच स्वतःची आणि कुटुंबीयांची काळजी घ्यावी. सतत मास्क वापरावा तसेच सॅनिटायझर चा सतत वापर करावा. माझ्या प्रभागातील जनतेची काळजी आम्ही घेत आहोतच पण नागरिकांनी देखील स्वतःची काळजी घ्यावी.