पंकज त्रिपाठीला जान्हवी कपूर चापलूस वाटते

मुंबई – जान्हवी कपूर चापलूस आहे, असे पंकज त्रिपाठीला वाटते आहे. पंकज त्रिपाठीचे आपल्याबाबत काय मत आहे, हे जान्हवीलाही चांगलेच माहिती आहे. जान्हवी तर पंकज त्रिपाठीचा खूपच सन्मान करते. जान्हवीला यासंदर्भात एका पार्टीतला एक किस्सा आठवला. एका पार्टीमध्ये पंकज त्रिपाठी मटण शिजवणे आणि ऍक्‍टिंगसंदर्भात बोलत होता. त्यावेळी जान्हवीपण त्याच्या समवेत बोलायला गेली होती. मात्र त्याचा अर्थ पंकज त्रिपाठीने वेगळाच काढला. जान्हवी चापलूस आहे, असे त्याला तेंव्हापासूनच वाटायला लागले असावे, असे जान्हवीने एका चॅट शो दरम्यान सांगितले. “धडक’नंतर जान्हवी “रुह-अफ्जा’ आणि करण जोहरच्या “तख्त’मध्ये जान्हवी दिसणार आहे. भारतीय वायुसेनेतील पायलट गुजन सक्‍सेनाच्या बायोपिकमध्येही जान्हवी काम करते आहे. “तख्त’मध्ये जान्हवी रणवीर सिंह बरोबर दिसणार आहे. तिच्या ऍक्‍टिंगमध्ये वैविध्य दिसण्यासाठी तिला मिळालेले हे वेगवेगळे रोल पुरेसे आहेत. त्यातून तिचा आत्मविश्‍वासही वाढणार आहे. ब्रेक मिळण्याच्या काळात असे वैविध्यपूर्ण रोल मिळण्यासाठी जान्हवीला काही चापलूसी करावी लागली नसावी, अशी आशा आहे. असे जरी असले तरी उमेदवारीच्या काळात अशी चापलुसी केली तरी काही गैर नसावे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.