अभिनेता अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा २’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या भाग १ च्या गाण्या सोबतच आयटम साँगनेही चाहत्यांची मन जिंकली आता भाग २ मधील आयटम साँग नेमकं कधी येणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.
पुष्पा २ मधील आयटम साँगबाबत महत्वाची अपडेट समोर आली आहे. भाग २ मध्ये समंथाचे आयटम साँग होणार नाही. अशी चर्चा सध्या रंगली आहे. यामध्ये तिच्या ऐवजी बॉलीवूड अभिनेत्री जान्हवी कपूर पुष्पा २ मध्ये आयटम साँग करू शकते असे मानले जात आहे. मात्र अद्याप नाव निश्चित झालेले नाही.
ओ अंतवा मावा हे गाणं खूप गाजलं आहे. या गाण्याने समंथा प्रत्येक घराघरात लोकप्रिय झाली. मात्र, यावेळी स्क्रिप्ट लहान करण्यासाठी, गरज नसल्यास आयटम साँग काढून टाकता येईल, असेही मानले जात आहे.
चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर, करोनाच्या काळात आलेल्या या चित्रपटाने साऊथ इंडस्ट्रीची जगभरात ओळख निर्माण केली होती. 350 कोटींचा गल्ला जमवला. लोकांनी हा चित्रपट खूप पाहिला आणि तो संपूर्ण मनोरंजनाचा होता.
रश्मिका मंदान्ना, अल्लू अर्जुन आणि फहद फाजील यांसारख्या कलाकारांच्या अभिनयाने सर्वांनाच प्रभावित केले. आता हा चित्रपट 6 डिसेंबर 2024 रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे. पहिल्या भागाच्या तुलनेत दुसऱ्या भागाची स्थिती कशी आहे हे पाहणे बाकी आहे.