जान्हवी कपूर दररोज जीममध्ये हजर असते. जीम आउटफिटमध्ये तिचे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत असतात. परंतू जान्हवी कपूर आता वजन वाढवणार आहे.
जान्हवी कपूर मागील काही काळापासून आपल्या अपकमिंग सिनेमा “रूहअफ्जा’ आणि “कारगिल गर्ल’च्या शूटिंगमध्ये व्यस्त होती. या चित्रपटांसाठी जान्हवीला “वेट चेंज’ परिस्थितीतून जावे लागत आहे. तिला कधी तर वजन कमी करावे लागते तर कधी वाढवावे लागते. सूत्रांप्रमाणे जान्हवी कपूरने गुंजन सक्सेनाच्या बायोपिकसाठी सहा किलो वजन वाढवले होते आणि दुसऱ्या हॉरर- कॉमेडी चित्रपटासाठी तिला दहा किलो वजन कमी करावे लागले होते. “रूहअफ्जा’मध्ये जान्हवीला हॉट आणि सेक्सी दिसायचे आहे. या चित्रपटाची शूटिंग संपल्यावर तिला ‘कारगिल गर्ल’ यासाठी पुन्हा मसल्ससाठी मेहनत घ्यावी लागणार आहे.
“कारगिल गर्ल’या चित्रपटात जान्हवी भारतीय वायुदलाची पायलट गुंजन सक्सेनाचे पात्र साकारणार आहे. जान्हवी आता या चित्रपटासाठी मेहनत घेत असून ती गुंजनला दोन वेळा भेटली देखील आहे. चित्रपट सुरू करण्यापूर्वी गुंजनप्रमाणे चालणे व बोलणे शिकण्याची तिची इच्छा आहे.
जान्हवी कपूर आठवड्यातून सहा दिवस वर्क आउट करते आणि दिवसाला दोन ते तीन तास. पहिल्या दोन दिवस जान्हवी कपूर ईएमएस करते आणि इतर चार दिवस ती पिलेट्ससाठी डेडिकेटेड असते. जान्हवीच्या ट्रेनर नम्रता पुरोहितने सांगितले की तिला गोड खाण्याची अत्यंत आवड आहे.