जान्हवी कपूरने “गुडलक जेरी’ या आपल्या आगामी सिनेमातला फर्स्ट लुक शेअर केला आहे. या सिनेमाचे शूटिंग पंजाबमध्ये सुरू झाले आहे. फर्स्ट लुकमध्ये जान्हवी पंजाबी सलवार घातलेली आणि स्मित हास्य करत रस्ताने चालताना दिसत आहे. जान्हवीचा “गुंजन सक्सेना-द कारगिल गर्ल’ प्रेक्षकांना खूप खूप आवडला होता. भारतीय हवाई दलातील पायलट गुंजन सक्सेनाच्या या बायोपिकला ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज केले गेले होते.
View this post on Instagram
त्यानंतर झोया अख्तरच्या “घोस्ट स्टोरीज’मध्ये तिने काम केले होते. त्यानंतर लवकरच “रुह अफजाना’ आणि “दोस्ताना-2′ मध्ये ती दिसणार आहे. आतापर्यंतच्या करियर मध्ये तिने आपल्या रोलपेक्षा कथेला अधिक महत्त्व दिल्याचे एका इंटरव्ह्यूमध्ये तिने सांगितले आहे. मात्र “अतरंगी रे’मध्ये टिपिकल मसाला कथानक असतानाही तिने हा सिनेमा स्वीकारला.
View this post on Instagram
“गुडलक जेरी’ मध्ये तिच्याबरोबर दीपक डोब्रियाल, नीता वसिष्ठ आणि नीरज सुद्धा हे देखील असणार आहेत. आनंद राय यांच्याबरोबर जान्हवीचा हा पहिला सिनेमा असणार आहे. “धडक’ मधून बॉलीवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर तिच्या वाट्याला वैविध्यपूर्ण रोल आले आहेत. आता पंजाबी गर्ल बनवून ती आपल्या करिअरमध्ये आणखीन वैविध्य आणण्यासाठी सिद्ध झाली आहे.