मुंबई – सध्या चित्रपटगृहांत साऊथ सिनेमांची चलती आहे. वेगळा विषय आणि वेगळी रचना यामुळे कांतारा सारखे लो बजेट चित्रपट देखील बॉलिवूडच्या अनेक चित्रपटांना धोबीपछाड देताना दिसत आहेत. म्हणून अनेक बॉलिवूड कलाकारांना साऊथची भुरळ पडलेली दिसते. यात अभिनेत्री जान्हवी कपूर देखील मागे नाही. जान्हवीने आपल्याला आवडणाऱ्या साऊथ कलाकाराबाबत नुकतच भाष्य केलं आहे.
जान्हवी कपूरचा ‘मिली’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाच्या प्रमोशनच्या वेळी तिला साऊथ चित्रपटांबद्दल विचारण्यात आले तेव्हा तिने सांगितले की, जर मला एखादा चांगला प्रोजेक्ट मिळाला तर नक्कीच चित्रपट करेल. तुला कोणत्या साऊथ स्टारसोबत काम करायचे आहे ? असे विचारले असता यावर जान्हवीने ज्युनियर एनटीआरचे नाव घेतले. जान्हवी म्हणाली की तिला कलाकार म्हणून एनटीआर खूप आवडतात. जर तिला एनटीआरसोबत काम करण्याची संधी मिळाली तर खूप आनंद होईल.
यापूर्वी जान्हवीला दाक्षिणात्य अभिनेत्याबद्दल प्रश्न विचारला होता तेव्हा तिने विजय देवरकोंडाचे नाव घेतले होते. तिने तिच्या मुलाखतींमध्ये विजयसोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. पण आता तिने एनटीआरचे नाव घेण्यास सुरुवात केली आहे. अशा स्थितीत नेटकरी तिला संधीसाधू म्हणत आहेत. अनेकांना वाटते की विजयचा ‘लाइगर’ यशस्वी झाला नाही, त्यामुळे जान्हवीने आता तिची निवड बदलली आहे तशबाबतच्या पोस्ट देखील काहींनी सोशल मीडियावर केल्या आहेत.