जान्हवी कपूर-सारा अली खानचे एकत्र वर्कआऊट

सारा अली खान आणि जान्हवी कपूर या दोघी पहिल्यापासूनच फिल्मी करिअरमध्ये एकमेकींच्या स्पर्धेत आहेत. मात्र, त्यांच्यातील ही स्पर्धा किती निखळ आहे, हे एका नवीन व्हिडिओमधून दिसून आले आहे. 

 

View this post on Instagram

 

A post shared by Sara Ali Khan (@saraalikhan95)

जान्हवी आणि सारा या दोघींनी नम्रता पुरोहित या पर्सनल ट्रेनरबरोबर वर्कआऊट करण्याचा एक व्हिडिओ मंगळवारी शेअर केला आहे. यामध्ये या दोन्ही एकत्र व्यायाम करताना दिसत आहेत. नम्रताच्या सूचनेप्रमाणे या दोघीही एकत्र व्यायाम करत आहेत. 

 

View this post on Instagram

 

A post shared by Sara Ali Khan (@saraalikhan95)

व्यायाम करताना दोघीही अगदी एकाग्र झाल्या आहेत. वर्क फ्रंटच्या बाबतीत बोलायचे तर साराने अलीकडेच “अतरंगी रे’चे शूटिंग संपवले आहे. यापूर्वी ती वरुण धवनबरोबर “कुली नंबर वन’मध्येही दिसली होती, तर जान्हवी कपूर “रुही’ या हॉरर कॉमेडीपटामध्ये राजकुमार राव आणि वरुण ठाकूर यांच्याबरोबर दिसणार आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.