अभिनेत्री जान्हवी कपूर नेहमीच चित्रपट आणि वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. जान्हवीने आता अभिनेता रोहित सराफसाठी झिरो कॅलरी पास्ता बनवला आहे, ज्याचा व्हिडिओ स्वतः रोहितने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे.
सोशल मीडियावरील तिच्या एका व्हिडिओमुळे ही अभिनेत्री चर्चेत आली आहे. या व्हिडिओमध्ये जान्हवी अभिनेता रोहित सराफसाठी ‘झिरो कॅलरी’ नाश्ता बनवताना दिसत आहे. हा व्हिडिओ रोहित सराफने शेअर केला आहे. व्हिडिओ शेअर करताना रोहित सराफने खास पोस्टही लिहिली आहे.
व्हिडिओमध्ये जान्हवी कपूर पास्ता बनवत आहे. रोहित सराफने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये जान्हवी कपूर पास्ता बनवताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये जान्हवी पास्ता कसा बनवायचा याबाबत सांगत आहे. जान्हवीने सैल पांढरा टी-शर्ट आणि पिवळा पायजमा घातला होता. व्हिडिओमध्ये जान्हवी आवडीने स्वयंपाक करताना दिसत आहे. दिग्दर्शक शशांकनेही व्हिडिओ शेअर केला आहे.
दरम्यान, अभिनेत्री जान्हवी कपूर ‘देवरा पार्ट 1’ या चित्रपटात दिसणार आहे. जान्हवी कपूर नेहमीच तिचे चित्रपट, वक्तव्ये, वैयक्तिक आयुष्य आणि लुक्समुळे चर्चेत असते. लवकरच ती ‘सनी संस्कार की तुलसी कुमारी’ या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे.