जान्हवी कपूर सध्या आपल्या आगामी दोन सिनेमांच्या रिलीजची वाट बघते आहे. त्याच दरम्यान तिने पाईपलाईनमधील आणखी एक सिनेमा स्वीकारला देखील आहे. तिने आता “हेलन’ नावाच्या मल्याळम सिनेमाच्या हिंदी रिमेकमध्ये काम करण्यास मंजूरी दिली आहे.
View this post on Instagram
जान्हवीचे पप्पा बोनी कपूर हेच या सिनेमाचे प्रॉडक्शन करणार आहेत. मूळ मल्याळम “हेलन’ ज्यांनी दिग्दर्शित केला. त्या मुथुकुट्टी झेवियर यांच्याकडेच हिंदी आवृत्तीच्या दिग्दर्शनाचीही जबाबदारी असणार आहे. हा एक सस्पेन्स थ्रिलर असणार आहे आणि सध्या या सिनेमाची तयारी जोरात सुरू आहे.
View this post on Instagram
दोन महिन्यांसाठी लखनौ आणि उत्तर प्रदेशातील अन्य काही भागांमध्ये या सिनेमाचे शूटिंग होणार आहे. “हेलन’ ही एका नर्सची कथा आहे. तिला कॅनडाला स्थायिक व्हायचे असते. मात्र एक दिवस ती कामावरून परत येत नाही. चक्क बेपत्ता होते. ही या सिनेमाची साधी कथा आहे.
View this post on Instagram
ऍना बेन ही या सिनेमाच्या मूळ मल्याळम सिनेमात लीड रोलमध्ये होती. आता हा लीड रोल जान्हवी करणार आहे, असे समजते आहे. दरम्यान जान्हवी “दोस्ताना 2′ आणि “द रूही अफजाना’ या दोन सिनेमांच्या रिलीजची वाट बघते आहे. काही दिवसांपूर्वीच “गुंजन सक्सेना : द कारगिल गर्ल’मध्ये दिसली होती.
View this post on Instagram