Janhvi Kapoor| अभिनेत्री जान्हवी कपूरने अल्पावधीतच बॉलीवूडमध्ये मोठे यश संपादन केले आहे. जान्हवी अभिनयासह तिच्या फॅशनमुळेही चर्चेत असते. त्याच्या हटके आणि दमदार स्टाइलला अनेकांची पसंती मिळते.
यातच जान्हवी आता फॅशन आणि स्टाईलच्या बाबतीत भारतातबाहेरही आपली जादू दाखवताना दिसत आहे. जान्हवी अनेकदा वेगवेगळ्या फॅशन रॅम्पवर वॉक करते. नुकतेच तिने पॅरिसमधील एका फॅशन वीकमध्ये रॅम्प वॉक केला आहे.
या रॅम्पच्या माध्यमातून जान्हवीने आंतरराष्ट्रीय रनवेची सुरुवात केली आहे. तिने तिच्या डेब्यू वॉकसाठी राहुल मिश्राने डिझाइन केलेल्या आउटफीट परिधान केला होता. या रॅम्प वॉकसाठी जान्हवीने निळया रंगाचा मरमेड स्टाइल स्कर्ट घातला होता. Janhvi Kapoor|
Instagram पर यह पोस्ट देखें
या स्कर्टवर अनोखं डिझाईन करण्यात आले आहे. जान्हवीने हा होलोग्राफिक स्कर्ट स्ट्रॅपलेस ब्लॅक सिक्विन बस्टिअर टॉपसह पेअर केला होता. राहुल मिश्राचे ‘ऑरा’ कलेक्शन सादर करण्यासाठी तिने इतर मॉडेल्ससह वॉक केला. या लूकमध्ये जान्हवीने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. Janhvi Kapoor|
जान्हवीच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, तिने ‘धडक’ या चित्रपटातून सिनेविश्वात पदार्पण केलं होतं. नुकताच तिचा ‘मिस्टर एन्ड मिसेस माही’ हा चित्रपट प्रदर्शित झाला असून या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला. या चित्रपटात जान्हवी ही अभिनेता राजकुमार रावसोबत झळकली.
आगामी काळात जान्हवी ‘उलझ’ या चित्रपटात झळकणार आहे. याशिवाय ‘देवरा पार्ट 1’ चित्रपटातून जान्हवी दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीत डेब्यू करणार आहे. त्याच्या या चित्रपटातबाबत चाहते देखील उत्सुक आहेत.
हेही वाचा: