बॉलीवूड अभिनेत्री जान्हवी कपूर सध्या कार्तिक आर्यनसोबत गोव्यात सुट्टी साजरी करत आहे. या दोघांचे गोव्यातील काही फोटो व्हायरल झाले आहेत.
View this post on Instagram
दरम्यान, जान्हवीने मुंबईत एक प्रॉपर्टी खरेदी केली आहे. या प्रॉपर्टीची किंमत लाखोंमध्ये नव्हे तर कोट्यवधींमध्ये आहे. जान्हवीच्या नवीन घराची किंमत तब्बल 39 कोटी आहे.
View this post on Instagram
जान्हवी कपूरने डिसेंबर 2020 मध्ये ही प्रॉपर्टी विकत घेतली आहे. जान्हवीचे हे नवीन घर मुंबईच्या जुहू परिसरात आहे. या घराचा करार 7 डिसेंबर रोजी झाला आहे. यासाठी जान्हवीनेही 78 लाख रुपये शुल्क देखील भरले आहे.
View this post on Instagram
तिने “धडक’ चित्रपटातून 2018 मध्ये बॉलीवूडमध्ये पाऊल ठेवले होते. ती अखेर “गुंजन सक्सेना द कारगिल गर्ल’ या चित्रपटात दिसली होती. हा चित्रपट लॉकडाऊनमुळे नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला होता. लवकरच ती “दोस्ताना 2’मध्ये दिसणार आहे.
View this post on Instagram