जान्हवी आणि ईशान पुन्हा एकत्र नाही

जान्हवी कपूर आणि ईशान खट्टर या दोघांचा डेब्यू सिनेमा “धडक’ गेल्या वर्षी रिलीज झाला आणि त्याला प्रेक्षकांनी खूप चांगला प्रतिसादही दिला होता. या सिनेमाच्या शुटिंगच्यावेळी जान्हवी आणि ईशान दोघांमध्ये खूपच चांगले बॉंडिंग निर्माण झाले होते. त्यांच्यातली केमिस्ट्री बघून आणखी एखाद्या सिनेमात त्यांना एकत्र घेतले जाईल, असा अंदाज वर्तवला जाऊ लागला होता.

त्या अंदाजानुसार या जोडीकडे असाच आणखी एक सिनेमा आलाही होता. मात्र दोघांनी हा सिनेमा नाकारला आहे, असे समजते आहे. कारण त्यांना आता एकमेकांच्याबरोबर काम करायचे नाही आहे. त्या दोघांचे अफेअर सुरु असल्याची अफवा पसरली होती. त्याच कारणाने त्यांनी हा निर्णय घेतला असल्याचे समजते आहे.

हे दोघेही एकसाथ जीमला जायचे. बहुतेक ठिकाणी एकत्रच जायचे. त्यामुळे मिडीयाने त्यांच्याबाबत चर्चा करायला सुरुवात केली होती. या अफवेला हे दोघेही वैतागले होते. आपली ओळख आपल्या कामावरून केली जावी, म्हणून त्यांनी कामावर लक्ष केंद्रीत करायचे ठरवले आहे. त्यासाठी एकत्र कामाचा मोठा सिनेमा नाकारला आणि स्वतंत्र काम करायला सुरुवात केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.