कतरिना कैफने अलीकडेच जान्हवी कपूरच्या जिम लुकबद्दल कमेंट केले होते. कतरिनाच्या कमेंटचा जान्हवीवर काहीही प्रभाव पडला नाही हे तिच्या नवीन लुकमुळे कळून आले. जान्हवीने पांढऱ्या रंगाचा पारदर्शी टी शर्ट आणि ब्राउन शॉर्टस घातलेले तिचे फोटो पुन्हा इंटरनेटवर व्हायरल झाले होते. यावेळी दोन वेण्यांमध्ये जिम जाताना तिने सहज कॅमेऱ्याकडे हसून बघितले आणि आत निघून गेली. उल्लेखनीय आहे की कतरिनाने म्हटले होते की, “मला जान्हवीचे लहान शॉर्टस बघून तिची काळजी वाटते. ती माझ्याच जिममध्ये येते. आम्ही सोबतच जिम करतो. कधी-कधी तिचे शॉर्टस बघून मला तिची काळजी वाटते.’ यावर सोनम कपूरने आपल्या बहिणीचे समर्थन करत सोशल मीडिया अकाउंटवर जान्हवी कपूरचा फोटो शेअर करत लिहिले होते की ती रेग्लुअर कपडे देखील परिधान करते आणि खूप छान दिसते.
जेव्हा यावर चर्चा सुरू व्हायला लागली तर सोनम कपूरने स्पष्टीकरण दिले की ‘मी आपल्या मैत्रीण कतरिना कैफच्या वक्तव्यावर जान्हवीचा डिफेन्स केलेले नाही. ही माझी आणि जान्हवीची खासगी गोष्ट आहे. मीडियाने यावर ड्रामा क्रिएट करु नये हीच विनंती.’
https://www.instagram.com/p/ByKFoM-Hn1R/?utm_source=ig_web_copy_link
“धडक’नंतर जान्हवी आता हवाई दलातील पायलट गुंजन सक्सेनाच्या बायोपिकमध्ये काम करणार आहे. “कारगिल गर्ल’ या नावाच्या या सिनेमाचे शुटिंग अलिकडे जम्मू काश्मीरमधील बर्फाळ प्रदेशात करायचे होते. पण तेथील हवामान खराब असल्याने शुटिंग तात्पुरते स्थगित केले गेले आहे. विषय अतिशय संवेदनशील असल्याने जान्हवीच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. पण कतरिनाला जान्हवीची काळजी वाटावी, याचा या सुरक्षा वाढवण्याशी काहीही संबंध नाही.