मुंबई – मराठेशाहीच्या इतिहासातील प्रत्येक पान अनेक शूर योद्ध्यांच्या पराक्रमाने सजलेलं आहे. हा सगळा इतिहास केवळ पुस्तकरूपात न राहता पुढच्या पिढीपर्यंत पोहचविणे गरजेचे आहे. लवकरच इतिहासातील आणखी एक सुवर्ण पान उलगडण्याची वेळ आली असून, पावनखिंड गाजविणारे ‘बाजीप्रभू देशपांडे’ यांची शौर्यगाथा रुपेरी पडद्यावर येणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या सेवेसाठी कायम तत्पर असणाऱ्या या लढवय्या आणि पराक्रमी मावळ्यावर आधारित ‘जंगजौहर’ हा ऐतिहासिक चित्रपट लवकर येणार आहे. नुकतंच या चित्रपटाचं अधिकृत पोस्टर प्रदर्शित करण्यात आले असून, पोस्टरवर ‘ते फकस्त ६०० व्हते…’ ही ओळ रेखाटण्यात आली आहे.
https://www.facebook.com/digpal.lanjekar/posts/10158346035418150
दरम्यान, १३ जुलैला (सोमवारी) या चित्रपटाची पहिली झलक पोस्टर आणि टीझर रुपात आपल्याला पाहायला मिळणार आहे. मराठी अभिनेता ‘गश्मीर महाजनी’ हा नरवीर बाजीप्रभू देशपांडे यांच्या भूमिकेत झळकणार आहे.