न्हावरे -न्हावरे – शिरूर ग्रामीण जिल्हा परिषद गटामध्ये जनता कर्फ्यूला आज (दि. 3) 100 टक्के प्रतिसाद मिळाला. जिल्हा परिषद गटामधील 16 गावे जनता कर्फ्यूमध्ये सहभागी झाली होती.
हॉस्पिटल्स आणि मेडीकल्स वगळता किराणा दुकाने, भाजीपाला विक्री दुकाने, फळांची दुकाने व कृषी सेवा केंद्रे यांनी जनता कर्फ्यूमध्ये सहभागी होऊन प्रशासनाला सहकार्य केले. विविध गावांमध्ये ठिकठिकाणी पोलीस व ग्रामपंचायत कर्मचारी हे सेवा देत होते.
त्यांच्याव्यतिरिक्त सर्वत्र शुकशुकाट पाहायला मिळाला. अशाच पद्धतीने सर्वांनी आगामी 14 तारखेपर्यंत प्रशासनाला सहकार्य करावे, असे पोलिसांच्या वतीने सांगण्यात आले.