जनआरोग्य योजना 5,327 जणांच्या मदतीला

योजनेची आणखी प्रभावी अंमलबजावणीची गरज : जिल्हाधिकारी

पुणे – महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत करोना काळात पुणे पालिका हद्द- 2,609, पिंपरी-चिंचवड-2,031, ग्रामीण भागातील रुग्णालयांनी 687 अशा 5 हजार 327 रुग्णांना लाभ दिल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिली. या योजनेअंतर्गत जास्तीत जास्त पात्र लाभार्थींना लाभ देण्याची कार्यवाही करावी, असेही यावेळी जिल्हाधिकारी म्हणाले.

यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात रुग्णालयांच्या प्रतिनिधींसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीला जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक नांदापूरकर, योजनेचे विभागीय समन्वयक डॉ. अमोल म्हस्के, जिल्हा समन्वयक डॉ. सागर पाटील, डॉ. प्रिती लोखंडे आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी म्हणाले, काही रुग्णालये पात्र लाभार्थींना अपेक्षित लाभ देण्यामध्ये कमी पडलेले आहेत. त्यामुळे आपण सर्वांनी याप्रकरणी गांभीर्याने व संवेदनशीलतेने लक्ष घालून परिस्थिती सुधारावी. महसूल विभाग, जिल्हा परिषदेतील कर्मचारी तसेच आरोग्य मित्र यांच्या समन्वयाने रुग्णालयांनी काम करावे. ही योजना सर्व लोकप्रतिनिधींमार्फत सर्व नागरिकांपर्यत पोहोचवावी.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.