बनिहाल – गेले दोन दिवस सुरू असलेल्या तुफानी पावसामुळे जम्मू-श्रीनगर मार्गावर अनेक ठिकाणी दरडी कोसळण्याचे प्रकार घडले आहेत. त्यामुळे हा महामार्ग आता वाहतुकीला बंद करण्यात आला आहे.
त्यामुळे काश्मीर खोऱ्याशी असलेला रस्ते संपर्क तुटला आहे. जम्मू -श्रीनगर हा 270 किमीचा महामार्ग हा ऑल वेदर मार्ग म्हणून प्रचलीत असून काश्मीर खोऱ्याला जोडणारा तो एक मुख्य रस्ता आहे.
या दरडी कोसळण्याच्या प्रकारामुळे महामार्गावर अनेक पॉइॅन्ट्स वर मोठ्या प्रमाणात दोन्हीं बाजूंनी वाहने अडकून पडली आहेत. मगेरकोटे भागात मोठ्या प्रमाणावर दरडी कोसळल्या असून त्या दूर करण्यासाठी मोठी सरकारी यंत्रणा कामाला लावण्यात आली आहे.
या महामार्गावरील नशरीपासून श्रीनगर पर्यंतची आणि बनिहालपासून रामबन पर्यंत वाहतूक पूर्ण थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.