जम्मू- श्रीनगर महामार्ग दरडी कोसळल्याने बंद

बनिहाल/ जम्मू,- मोठ्या प्रमाणात दरडी कोसळल्यामुळे जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग रविवारी दुपारी पुन्हा एकदा रामन जिल्ह्यात बंद झाला आणि काही तासांनी या मार्गावरची वाहतूक सुरू झाली. त्यामुळे महामार्गाच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. रामबन शहरापासून दोन कि.मी. अंतरावरच्या महार जवळ ही दरड कोसळली होती.

त्यामुळे तब्बल 13 तास या महामार्गावरील वाहतुक बंद होती आणि जम्मू- श्रीनगरची वाहतुक मोठ्या प्रमाणावर खोळंबली होती. महामार्गावरील सुमारे 100 मीटरच्या भागात मोठ्या प्रमाणावर दगड, माती आणि मोठ्या शिळा पडल्या होत्या. हा अडथळा हटवण्याचे काम वेगाने सुरू होते. मात्र तरिही 12 तासांपेक्षा अधिक काळापर्यंत वाहतुक बंद ठेवावी लागली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.