जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून जवानाचे अपहरण

श्रीनगर – जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा एकदा दहशतवाद्यांनी एका जवानाचे अपहरण केले आहे. मुदासिर अहमद असे जवानाचे नाव असून तो त्याच्या नातेवाईकांना भेटण्यास पुलवामा जिल्ह्यातील त्राल येथे गेला असता दहशतवाद्यांनी त्याचे अपहरण केले, असा दावा त्याच्या कुटुंबांनी केला आहे. परंतु, या वृत्ताला अजूनपर्यंत पोलिसांकडून दुजोरा मिळालेला नाही.

दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून जवानांच्या अपहरण करण्याच्या घटनेमध्ये वाढ झाली आहे. मागील महिन्यातच सुट्टीवर घरी जाणाऱ्या सलीम शाह या जवानाची दहशतवाद्यांनी अपहरण करून हत्या केली होती.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)