जम्मू-काश्मीर : महामार्गावर कारमध्ये स्फोट; थोडक्यात बचावला सीआरपीएफचा ताफा

श्रीनगर – जम्मू-काश्मीरच्या राष्ट्रीय महामार्गावर एका संशयित कारमध्ये स्फोट झाला. ही घटना बनिहालजवळ घडली. कोणतीही जीवित हानी झाली नसल्याची माहिती मिळत आहे. घटनास्थळी पोलिस पोहचले असून तपास सुरु आहे. दरम्यान, याच  महामार्गाने सीआरपीएफचा ताफा जात होता.

प्राथमिक माहितीनुसार, सँट्रो कारचा स्फोट झाला आहे. या स्फोटात सीआरपीएफच्या गाडीचे किरकोळ नुकसान झाल्याचे कळत आहे. स्फोटानंतर कारचालक बेपत्ता असून त्याचा शोध घेतला जात आहे.

सीआरपीएफनी दिलेल्या माहितीनुसार, प्रथमदर्शनी कारमध्ये झालेला हा स्फोट सिलेंडर स्फोट असल्याचे दिसत आहे. स्फोट झाला तेव्हा सीआरपीएफचा ताफा फार जवळच्या अंतरावर होता. हा दहशतवादी हल्ला वाटत नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.