श्रीनगर – सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली असून यामध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश आले आहे. ही चकमक आज शनिवारी सकाळी श्रीनगर शहरातील जाकुरा भागात झाली आहे. यावेळी दोन पिस्तूलसह इतर गुन्हेगारी साहित्य जप्त करण्यात आली आहेत. ठार झालेले हे दहशतवादी लष्कर-ए-तैयबा आणि टीआरएफचे सदस्य होते.
#SrinagarEncounterUpdate: 02 #terrorists of terror outfit LeT/TRF #neutralised by Srinagar Police. One of the killed terrorists Ikhlaq Hajam was involved in recent killing of HC Ali Mohd at Hassanpora Anantnag. Incriminating materials including 02 pistols recovered: IGP Kashmir https://t.co/9vktIRpcJM
— Kashmir Zone Police (@KashmirPolice) February 5, 2022
अनंतनागच्या हसनपोरा येथे अलीकडेच झालेल्या एचसी अली मोहम्मद यांच्या हत्येतही ठार झालेल्या दहशतवाद्यांपैकी एकाचा हात होता. इखलाक हजम असे या दहशतवाद्याचे नाव आहे. जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात सुरू असलेली कारवाई वेगाने सुरू आहे, जेणेकरून खोऱ्यात शांतता आणि सुव्यवस्था राखता येईल. नुकतेच गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी राज्यसभेत सांगितले की, जम्मू-काश्मीरमधील कलम 370 रद्द केल्यानंतर आतापर्यंत 439 दहशतवादी मारले गेले आहेत. या कालावधीत केंद्रशासित प्रदेशात 541 दहशतवादी घटनांची नोंद झाली आहे.
“या घटनेदरम्यान सार्वजनिक मालमत्तेचे कोणतेही मोठे नुकसान झाले नाही.” मात्र, वैयक्तिक मालमत्तेचे सुमारे 5.3 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. अशी माहिती गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी दिली आहे. याशिवाय, गृह राज्यमंत्र्यांनी राज्यसभेत सांगितले की, बेकायदेशीर क्रियाकलाप (प्रतिबंध) कायदा, 1967 अंतर्गत, देशातील 42 दहशतवादी संघटना पहिल्या अनुसूचीमध्ये सूचीबद्ध आहेत.