Jammu-Kashmir Budget Session : जम्मू आणि काश्मीर विधानसभेत आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सुरुवातीला मोठा गदारोळ झाल्याचे पाहायला मिळाला. ओमर अब्दुल्ला यांच्या नॅशनल कॉन्फरन्स (एनसी) आणि मेहबूबा मुफ्ती यांच्या पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (पीडीपी) च्या आमदारांनी सभागृहात ‘इस्रायल मुर्दाबाद’च्या घोषणा दिल्या. इराणचे माजी सर्वोच्च नेते खामेनी यांचे बॅनरही फडकवण्यात आले. भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) आमदारांनी नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीला पाठिंबा देणारे बॅनर फडकवले. आमदारांनी खामेनी यांचा फोटो घेऊन विधानसभेच्या मध्यभागी (वेलमध्ये) आंदोलन केले. दरम्यान, भाजपने ‘भारत माता की जय’ आणि ‘वंदे मातरम’च्या घोषणा दिल्या. या गदारोळात ‘अमेरिका मुर्दाबाद’च्या घोषणाही ऐकू आल्या. आमदार काळ्या वेशात Jammu-Kashmir Budget Session : नॅशनल कॉन्फरन्सचे आमदार तनवीर सादिक यांनी काळे कपडे परिधान केले होते आणि कपाळावर काहीतरी लिहिले होते. इराणवरील इस्रायली आणि अमेरिकन हल्ल्यांना या आमदारांचा विरोध आहे. शिवाय, भाजप आमदाराने ‘जम्मूला न्याय द्या’ अशा घोषणा दिल्या आणि राष्ट्रीय विधी विद्यापीठाच्या स्थापनेची मागणी केली. सभागृहाचे कामकाज अर्ध्या तासासाठी तहकूब करण्यात आले आणि मार्शल्सना बोलावण्यात आले. Jammu-Kashmir Budget Session : सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे आमदार घोषणाबाजी करताना आणि फलक हातात धरलेले दिसले. परिस्थिती इतकी अनियंत्रित झाली की, केवळ २०-२५ मिनिटांच्या कामकाजानंतर सभागृहाचे कामकाज अर्ध्या तासासाठी तहकूब करण्यास भाग पडले. सभागृहाचे कामकाज सकाळी ११:०० वाजता पुन्हा सुरू होईल. इस्रायलविरोधी घोषणांनी या गदारोळाला सुरुवात झाली. सत्ताधारी पक्षाचे (एनसी, काँग्रेस), पीडीपीचे आणि काही अपक्ष आमदारांनीही इस्रायल आणि अमेरिकेविरोधात घोषणाबाजी केली. गोंधळ इतका वाढला की मार्शल्सना तैनात करावे लागले. नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ घोषणा Jammu-Kashmir Budget Session : सभागृहातील गदारोळादरम्यान भाजप आणि काँग्रेसचे आमदार एकमेकांसमोर आले. दोन्ही पक्षांच्या आमदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी सुरू केली. परिस्थिती चिघळली आणि धक्काबुक्की झाली. जर मार्शल्सनी हस्तक्षेप केला नसता, तर त्याचे रूपांतर हाणामारीत झाले असते.