जम्मू काश्मीर – शोपियन जिल्ह्यात २ दहशतवाद्यांना कंठस्नान

श्रीनगर –  जम्मू काश्मीर मधील शोपियन जिल्ह्यात सुरक्षा दले आणि दहशतवादी यांच्या मध्ये झालेल्या चकमकीत २ दहशतवाद्यांना ठार करण्यात सुरक्षादलांना यश मिळाले आहे. सुरक्षा दलांना मिळालेल्या माहितीनुसार शोध मोहीम हाती घेण्यात आली होती.

जैश-ए-मोहम्मद या संघटनेतील दोन दहशतवाद्यांना आज सुरक्षादलानी कंठस्नान घातले आहे. या दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि दारुगोळा सापडल्याची माहिती सेना दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. यातील एका दहशवाद्याचे नाव अबिद वागे असून तो शोपियन मधील रावलपोरा येथील निवासी आहे, तर दुसरा शाहजहांन मीर हा अमेशपोरा येथील असल्याचे सेना दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. या संपूर्ण भागाला भारतीय सुरक्षादलांनी घेराव घातला असून सर्च ऑपरेशन अद्याप सुरु असल्याची माहिती मिळाली आहे.

 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.