जम्मू काश्मीर – शोपियन जिल्ह्यात २ दहशतवाद्यांना कंठस्नान

जम्मू काश्मीर – जम्मू काश्मीर मधील शोपियन जिल्ह्यात सुरक्षा दले आणि दहशतवादी यांच्यामध्ये सकाळी झालेल्या चकमकीत २ दहशतवाद्यांना ठार करण्यात सुरक्षादलांना यश मिळाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार या संपूर्ण भागाला भारतीय सुरक्षादलांनी घेराव घातला असून सर्च ऑपरेशन अद्याप सुरु असल्याची माहिती मिळाली आहे.

तत्पूर्वी, पीडीपीच्या प्रमुख मेहबूबा मुफ्ती यांनी ट्‌विटरवरून  म्हटले होते की,’  भारताने जर त्यांच्याकडील अण्वस्त्रे दिवाळीसाठी ठेवली नसतील तर पाकिस्ताननेही अण्वस्त्रे ईदसाठी ठेवलेली नाहीत. या ट्विटद्वारे मुफ्ती यांनी रमजानचा महिना सुरु असल्याने दहशतवाद्यांनी तसेच लष्करानेही कारवाया करू नयेत असेही आवाहन केले होते.’

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×