पुलवामा – जम्मू – काश्मीरमधील पुलवामा सेक्टरमध्ये जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीमध्ये २ दहशतवाद्यांना कंठस्थान घालण्यात जवानांना यश आलं आहे. तर चकमकीत दोन जवान जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.
Jammu & Kashmir: An exchange of fire between terrorists and security forces began in Dalipora area of Pulwama earlier this morning. (Visuals deferred by unspecified time) pic.twitter.com/BW3aFWelN2
— ANI (@ANI) May 16, 2019
वृत्त संस्थेच्या वृत्तानुसार, गेल्या काही दिवसांपासून नौशेरा, पुंछ आणि पुलवामा सेक्टरमध्ये दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु होती, यातच पुलवामा सेक्टरमध्ये गुरुवारी सकाळी दलाला दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश आलं आहे. तर पुलवामा सेक्टरमध्ये आणखी दहशतवादी लपून बसल्याची शक्यता वर्तवली जात असून सुरक्षा दलाकडून सर्च ऑपरेशन सुरु आहे.