जम्मू काश्‍मीरमध्ये पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन

श्रीनगर : जम्मू-काश्‍मीर नियंत्रण रेषेजवळच्या शहापूर आणि पूंछ भागातल्या भारतीय छावण्यांवर पाकिस्तानी सैन्याने हातगोळ्यांचा मारा करत युद्धबंदीचे उल्लंघन केले. प्रत्त्युतरादाखल भारतीय सैन्याने जोरदार गोळीबार केला. या गोळीबारामध्ये कोणतीही जिवीतहानी झाल्याचे आतापर्यंत वृत्त नाही.

अखनूर भागातल्या एका स्फोटामध्ये जखमी झालेल्या जवानाचा आज मृत्यू झाला. त्याच्यावर उधमपूर येथील लष्करी रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते. त्याच्याशिवाय अन्य दोन जवानही याच स्फोटामध्ये जखमी झाले होते.

त्यांच्यावरही याच रुग्णालयात उपचार सुरू आहेत. लष्कराच्या ट्रकमधून प्रवास करत असताना हा स्फोट झाला होता. या संदर्भातील अधिक तपशील उपलब्ध व्हायचा आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.