जम्मू-काश्मीरमधील शोपियानमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली आहे. या परिसरात दोन ते तीन दहशतवादी असण्याची भीती आहे. कालबील परिसरात संशयास्पद हालचाली सुरू असल्याची माहिती यंत्रणांना मिळाली. यानंतर परिसरात तपासणी मोहीम राबविण्यात आली. दरम्यान, एका घरात दहशतवादी असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी घेरले. या भागात मोठ्या प्रमाणात सुरक्षा दल पोहोचले आहे. या ठिकाणी नागरिकांच्या ये-जा करण्यास बंदी घालण्यात आली आहे.
प्रजासत्ताक दिनानिमित्त श्रीनगर शहर आणि लगतच्या परिसरात दहशतवादी हल्ले होण्याची शक्यता लक्षात घेऊन सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. दहशतवाद्यांचे नापाक मनसुबे उधळून लावण्यासाठी सुरक्षा दलांकडून आगामी काळात सातत्याने शोध मोहीम राबवली जात आहे.
शुक्रवारीही जम्मू-काश्मीरच्या स्पेशल ऑपरेशन ग्रुप आणि सीआरपीएफच्या व्हॅली क्यूएटीच्या जवानांनी श्रीनगरच्या लाल चौक आणि लगतच्या भागात शोधमोहीम राबवली. यावेळी मोबाईल चेक पॉइंट उभारून लोकांची तसेच वाहनांची झडती घेण्यात आली.
याशिवाय श्रीनगरच्या सर्व प्रवेशद्वारांवर फिरते नाकेही लावण्यात आले आहेत. तसेच संशयास्पद वाहने व व्यक्तींचा शोध घेतला जात आहे.