Jammu And Kashmir । जम्मू आणि काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यात नियंत्रण रेषेजवळ (एलओसी) गस्त घालणाऱ्या भारतीय सैनिकांवर पाकिस्तानी हद्दीतून गोळीबार झाला. सुरक्षा अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, “भारतीय सैनिकांनी लगेचच प्रत्युत्तर दिले ज्यामुळे हल्लेखोर मागे हटले”. या घटनेत कोणत्याही प्रकारचे नुकसान झाल्याचे वृत्त नाही. तरी पण लष्कराला सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
सुरक्षा अधिकाऱ्यांनी सांगितले की, “पाकिस्तानी चौक्या ‘तातीक-१’ आणि ‘जबरन एफडब्ल्यूडी (जीएफ-९८३८)’ वरून गोळीबार करण्यात आला. त्यावेळी भारतीय सैनिक त्यांच्या चौकीजवळ गस्त घालत होते. भारतीय सैन्यानेही प्रत्युत्तर दिले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली.
घुसखोरी रोखण्यासाठी नियंत्रण रेषेवर कडक पहारा Jammu And Kashmir ।
भारतीय गुप्तचर संस्थांचा दावा आहे की,” पाकिस्तानने उन्हाळ्यात जम्मू आणि काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ले करण्यासाठी नियंत्रण रेषेपलीकडे लाँच पॅडवर सुमारे ८० ते १०० दहशतवाद्यांना तयार ठेवले आहे. घुसखोरीचा कोणताही प्रयत्न त्वरित हाणून पाडता यावा यासाठी लष्कर आणि सुरक्षा यंत्रणांना हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे.
पाकिस्तानला परिणाम भोगावे लागतील Jammu And Kashmir ।
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी अलिकडेच अखनूर येथे माजी सैनिकांच्या रॅलीत पाकिस्तानला कडक इशारा दिला होता. जर पाकिस्तानने पीओकेमधील दहशतवादी तळ आणि लाँच पॅड नष्ट केले नाहीत तर त्यांना गंभीर परिणाम भोगावे लागतील, असे त्यांनी म्हटले होते. भारतीय लष्कर कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहे आणि देशाच्या सुरक्षेशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असेही त्यांनी सांगितले. माजी सैनिकांना संबोधित करताना त्यांनी त्यांना आश्वासन दिले की भारत आपल्या सीमांचे रक्षण करण्यासाठी आवश्यक ते सर्व पाऊल उचलेल.
हेही वाचा
‘ओवेसी किंवा मायावती नाही तर’आप’च्या पराभवामागे काँग्रेसचा ‘हात’ ; ‘आप’ची मते खाणारी आकडेवारी समोर
“जेव्हा जेव्हा महिलेवर अन्याय झाला तेव्हा..” ; केजरीवालांच्या पराभवावर स्वाती मालीवाल यांची खोचक टीका
भाजपच्या विजयानंतर दिल्लीकरांना होणार फायदा; काय-काय मिळणार मोफत?