जामखेड : जलसंधारणाच्या कामांमुळे पाण्याची पातळी चांगली : राम शिंदे

तालुक्यातील खर्डा येथील खैरी तलावाचे जलपूजन संपन्न

जामखेड (प्रतिनिधी) – जामखेड तालुक्यात जलसंधारण मंत्री असताना मंजूर करून आणलेल्या निधीचा सदुपयोग करून करण्यात आलेल्या जलसंधारणाची मोठी कामे करण्यात आली जलसंधारणाच्या विविध कामांमुळे गाव-शिवार जलयुक्त झाले आहे. साठलेल्या पाण्यामुळे शिवारातील आणि पिण्याच्या पाण्याच्या विहिरीच्या तसेच बोअरच्या पाणीपातळीत वाढ होण्यास मदत झाली आहे.त्यामुळे पावसाळ्यात पाण्याची पातळी वाढली असून खोलीकरण केलेले ओढे, बंधारे, तलाव भरुन वाहू लागल्याने तसेच साचलेले आणि वाहणारे पाणी पाहून परिसरातील शेतकरी आनंदित झाले आहे असे प्रतिपादन माजी मंत्री राम शिंदे यांनी केले.

तालुक्यातील एकमेव मोठा प्रकल्प असलेला खैरी तलावातील पाण्याचे जलपूजन माजी मंत्री राम शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पं स सदस्य डाॅ भगवानदादा मुरुमकर,उप-सभापती मा रवीदादा सुरवसे,जि प सदस्य सोमनाथ पाचरणे युवा मोर्चा तालुकाध्यक्ष शरद कार्ले,प्रविन चोरडीया,वैजीनाथ पाटिल,सोमनाथ राळेभात, मोहन गडदे, भागवत सुरवसे, सातेफळचे सरपंच गणेश लटके,तरडगावचे सरपंच डॉ. जयराम खोत, वाकीचे सरपंच नाना वायकर,सह तरडगाव,सातेफळ,वाकी,दौडाचीवाडी,लोनी येथील सरपंच,ग्रा पं सदस्य,व ग्रामस्त,भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना राम शिंदे म्हणले कि, जलसंधारणाच्या कामामुळे पाण्याच्या पातळीत कमालीची वाढ झाली असून दुष्काळ निवारण होण्यासाठी जलसंधारणाची कामे वरदायी ठरली आहेत.

तालुक्यात काही भागात जलक्रांती घडली आहे. त्या ठिकाणचा परिसर हिरवागार झाला आहे. दुष्काळी कलंक पुसण्याचे काम हे केवळ जलसंधारण कामामुळे होईल. दुष्काळ निवारण करण्यासाठी जलसंधारणच वरदायी ठरले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.