जामखेड तालुक्‍यात ग्रामपंचायतचे संमिश्र निकाल

जामखेड – तालुक्‍यातील हळगाव, जवळा, धनेगाव, फक्राबाद ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आहेत. यामध्ये तालुक्‍यातील मोठी व तालुक्‍याचे लक्ष लागलेल्या जवळा ग्रामपंचायत निवडणुक पालकमंत्री राम शिंदे यांचे कट्टर समर्थक युवा नेते प्रशांत शिंदे यांच्या जवळा ग्रामविकास पॅनलने 16 पैकी 14 जागा जिंकून सरपंचपदी वैशाली सुभाष शिंदे या मोठय़ा फरकाने विजयी झाल्या. वैशाली शिंदे यांना 2946 ( विजयी) तर इंदूमती संतराम सुळ यांना 1142 (पराभूत) मते मिळाली.

हळगाव येथे कॉंग्रेसचे नेते किसनराव ढवळे यांच्या सुनबाई अनिता सूसेन ढवळे यांनी मोठी आघाडी घेत सरपंचपदाची लढत जिंकली. तसेच भैरवनाथ विकास पॅंनलचे तथा कॉंग्रेसचे नेते किसनराव ढवळे यांनी 12 पैकी 9 जागा मिळवत हळगाव ग्रामपंचायवर स्पष्ट बहुमत मिळवले.
सरपंचपदासाठी अनिता सूसेन ढवळे यांना 1216 (विजयी)तर मंगल गहिनीनाथ वाघमोडे यांना 942(पराभूत मते मिळाली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

धनेगावमध्ये स्थानिक विकास आघाडीचे महेश शहाजी काळे हे सरपंचपदासाठी विजयी झाले असून ग्रामपंचायतीच्या सर्व जागा जिंकल्या आहेत. येथे विरोधी पॅनलला खातेही उघडता आले नाही. धनेगाव सरपंचपदासाठी महेश शहाजी काळे यांना 575(विजयी ) तर भारत बापूराव काळे यांना 438(पराभूत ) मते मिळाली.

फक्राबाद ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी राष्ट्रवादीचे नेते तथा माजी जि.प. सदस्य विश्वनाथ शंकर राऊत हे विजयी झाले असून ग्रामपंचायतीमध्ये 9 पैकी 7 जागा मिळवत स्पष्ट बहूमत मिळवले. विश्वनाथ शंकर राऊत यांना 776(विजयी ) तर मकरंद दिनकर राऊत 504,(पराभूत) संतोष देविदास मोहळकर 197(पराभूत) मते मिळाली. निवडीनंतर विजयी उमेदवारांन जल्लोष करत गुलाल व फटाके वाजवून आनंद व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)