जामखेड तालुका भाजपची नवी ‘जम्बो’ कार्यकारिणी जाहीर

नव्या टीममध्ये कुणाला मिळालं स्थान?

जामखेड (प्रतिनिधी) – भाजपची जामखेड तालुका कार्यकारिणी अखेर जाहीर झाली.तालुकाध्यक्ष अजय काशीद यांनी जाहीर केलेल्या या कार्यकारिणीत ७० जणांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये तालुका कार्यकारिणीत २५ उपाध्यक्ष, ६ सरचिटणीस, २ चिटणीस, ६ शहराध्यक्ष विविध ८ आघाड्यांचे अध्यक्ष, तसेच कोषाध्यक्ष अशा विविध पदांवर काशीद यांनी नियुक्त्या केल्या आहेत. तालुक्यातील पक्षाचे माजी मंत्री तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांतील पदाधिकाऱ्यांना कायम निमंत्रित सदस्य म्हणून स्थान देण्यात आले आहे. तालुक्यातील प्रत्येक गावात पद दिल्याने भाजपात नवचैतन्य निर्माण झाले आहे

भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष व माजी मंत्री राम शिंदे व भाजपचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुकाध्यक्ष अजय काशीद यांनी जाहीर केलेली नूतन कार्यकारिणी – तालुका उपाध्यक्षपदी-लिलावती गीते, कविता राजगुरू, निकिता राऊत, वैजिनाथ पाटील, संतोष पवार, बापूराव ढवळे, सरचिटणीसपदी – लहू शिंदे, केशव वणवे, कोषाध्यक्षपदी – अमित चिंतामणी, तालुका सरचिटणीसपदी – विजया मुळे, राधाबाई भोंडवे, राहुल राऊत, नागराज मुरूमकर, गणेश लटके, प्रशांत शिंदे, शहराध्यक्षपदी – बिभीषन धनवडे, युवा मोर्चाच्या तालुकाध्यक्षपदी – शरद कार्ले, महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षपदी – मनीषा मोहळकर, अनुसूचित जाती मोर्चाचा तालुकाध्यक्षपदी – संतोष गव्हाळे, अल्पसंख्याक मोर्चाचा तालुकाध्यक्षपदी – अल्ताफ शेख, शेतकरी मोर्चाचा तालुकाध्यक्षपदी – साहेबराव बोराटे, ओबीसी मोर्चाचा तालुकाध्यक्षपदी – गौतम कोल्हे, व्यापारी आघाडीच्या तालुकाध्यक्षपदी – प्रवीण चोरडिया, वैद्यकीय आघाडीच्या तालुकाध्यक्षपदी – डॉ. दीपक वाळूंजकर या प्रमुख पदासह कायम निमंत्रित सदस्यपदी माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांच्यासह २० जणांची तर तालुका कार्यकारणीत २५ जणांची नियुक्ती करून कार्यकर्त्यांना करण्यात आली आहे.

यावेळी काम करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याला पद देऊन त्याच्या कामाची पावती पक्षाच्या वतीने देण्यात आल्याचे अध्यक्ष अजय काशीद यांनी सांगितले. यापुढील काळात सर्व जेष्ठ मंडळींना विश्वासात घेऊन तसेच युवा कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देऊन पक्ष बळकट करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे आश्वासनही काशीद यांनी दिले.

Leave A Reply

Your email address will not be published.