जामखेड(प्रतिनिधी) – छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने राहुल कन्स्ट्रक्शन व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमार्फत सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून राज्यस्तरीय वैयक्तिक व समूह नृत्य स्पर्धचे आयोजन केल्याची माहिती मनसे नेते उद्योजक हवादादा सरनोबत, कुसडगावचे सरपंच बापूसाहेब कार्ले यांनी दिली.
येथील पंचायत समितीसमोर असलेल्या प्रागंणात दि. 19 फेब्रुवारी रोजी सकाळी साडेनऊ वाजता छत्रपती श्री शिवाजीमहाराज यांच्या प्रतिमेचे पूजन आमदार रोहित पवार यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यानंतर 6 ते 15 गटमध्ये वैयक्तिक नृत्य स्पर्धा होणार आहे. यासाठी प्रथम बक्षीस वैभव जामकावळे 5 हजार 222, द्वितीय बक्षिस आलेश जगदाळे 3 हजार 222, तृतिय बक्षिस बिभिशन कदम 2 हजार 222, चतुर्थ बक्षीस गणेश पवार 1 हजार 222 असणार आहे.
सायंकाळी 5 वाजता खुला गट समूह नुत्य स्पर्धचे आयोजन करण्यात आले असून प्रथम बक्षीस प्रा. सचिन गायवळ 21 हजार 222 , द्वितीय बक्षिस संतोष फिरोदिया 11 हजार 222, तृतिय बक्षिस शरद शिंदे 7 हजार 222 सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्रक विजेत्यांना बक्षीस वितरण त्याच दिवशी देण्यात येणार आहे.
या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी श्रीधर सिध्देश्वर, ओंकार दळवी ,अविनाश बोधले, रजणीकांत साखरे, सनी सदाफुले यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी मनसे नेते हवादादा सरनोबत, मनसे तालुकाध्यक्ष प्रदिप टापरे, कुसडगांवचे सरपंच बापुसाहेब कार्ले, उपाध्यक्ष सनी सदाफुले, विशाल भांडवलकर, बालु साठे, सोनु कदम आदींसह कार्यकर्ते परिश्रम घेत आहे.