जामखेड : गव्याच्या हल्ल्यात शेतकरी जखमी; परिसरात भीतीचे वातावरण

जामखेड  – तालुक्यातील वांजरवाडी शिवारात आज दुपारी गव्याचे दर्शन झाले असून गव्याच्या हल्ल्यात एक शेतकरी जखमी झाला आहे. याबाबतची माहिती शेतकऱ्यांना मिळताच त्यांच्यामध्ये एकच खळबळ उडाली. घटनास्थळी वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली. त्यावेळी गव्याच्या पावलांचे ठसे आढळले. गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

वांजरवाडी येथील शेतकरी संतोष भीमराव दराडे हे जयभाय वस्ती येथील आपल्या शेतात काम करत असताना सायंकाळी ५ ते सहा वाजण्याच्या सुमारास गव्याने त्यांच्यावर हल्ला चढविला. यामध्ये दराडे यांच्या डोक्याला व पायाला मार लागल्याने ते जखमी झाले. त्यांना गावातील खाजगी दवाखान्यात नेण्यात आले.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत गव्याचा शोध सुरु केला असून सदर गवा हा अरणगाव पाटोदा या गावाकडे गेल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान एकीकडे जामखेड तालुक्यात कोरोनाने पुन्हा आपले हातपाय पसरवायला सुरवात केली असून त्यातच आता गव्याने एंट्री केल्याने शेतकऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.