जामखेड: सकाळी मतदान करायला जात असताना जामखेड मधील बांधखडक येथे भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन गटात शाब्दिक चकमकीतून हाणामारी झाली असल्याची घटना घडली आहे.
या घटनेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांवर धारदार शास्राने हल्ला केला असून या हल्ल्यात दोन जण जखमी झाले असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. जखमींवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतले आहे.
पोलिसांकडू माहिती अशी की, जामखेड तालुक्यातील बांधखडक येथे दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास भाजपचे कार्यकर्ते भालेराव हिरालाल वनवे (वय २८), हर्षवर्धन शंकर कुंदे (वय २२, रा. दोघे बांधखडक) हे मतदान करण्यासाठी जात होते.
यावेळी विरोधी गटातील राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी भालेराव, वनवे यांच्या नाकावर व हातावर चाकू हल्ला केला. तर हर्षवर्धन कुंदे याच्या हातावर चाकू हल्ला करण्यात आला. यामध्ये दोन जण जखमी झाले आहेत. जखमींना जामखेड ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात केले आहे.
कर्जत जामखेड तालुक्यात 4 वाजेपर्यंत 55 टक्के मतदान
प्रभात इफेक्ट : अखेर त्या चिखलयुक्त रस्त्यावर मुरूमीकरण