जामखेडमध्ये 127 गणेश मंडळांनी दिला गणरायाला निरोप

जामखेड- विसर्जन स्थळी गणरायाला निरोप देताना बालगोपाल दिसत आहेत.

जामखेड – “गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर’ या च्या जयघोषात व मंगलमय वातावरणात दहा दिवसांच्या गणरायाला जामखेड तालुक्‍यातील 127 गणेश मंडळांनी ढोल-ताशांच्या गजरात वाजत-गाजत निरोप दिला. किरकोळ प्रकार वगळता गणेश विसर्जन मिरवणूका शांततेत पार पडल्या.

तालुक्‍यात एकुण 127 गणेश मंडळांनी गणेशमुर्तींची स्थापना केली होती. यामध्ये 57 ठिकाणी एक गाव एक गणेश मंडळांनी तर शहरात 21 गणेश मंडळांनी गणरायाला निरोप दिला. शहरासह परिसरातील घरगुती, सार्वजनिक व बालगणेश मंडळांनी रविवारी सकाळपासूनच जय्यत तयारी केली होती. सकाळपासूनच गणेश विसर्जनाची तयारी करण्यासाठी मंडळाच्या कार्यकर्त्यांची लगबग सुरू होती.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

परिसरातील मंडळांनी पारंपरिक वाद्य आणि बॅंड पथकाच्या तालावर काढलेल्या मिरवणुका रात्री बारा वाजण्याच्या आतमध्ये खर्डा रोडवरील नगरपरिषदेने व्यवस्था केलेल्या विसर्जन पाणवढ्यात गणरायाचे भक्तिमय वातावरणात विसर्जन करण्यात आले. या मिरवणुकीत मोठ्या उत्साहाने गणेशभक्‍त सहभागी झाले होते.

शहरातील मंडळांनी वाजत गाजत विसर्जन मिरवणूका काढुन गणरायाला निरोप दिला. दोन दिवसात किरकोळ प्रकार वगळता सर्व विसर्जन मिरवणूका अतिशय उत्साहात व शांततेत पार पडल्या. यावेळी जामखेड नगरपरिषद, मुस्लिम विकास परिषद, जिव्हाळा फाऊंडेशन, संभाजी ब्रिगेड मराठा सेवा संघ यांनी मिरवणूकी दरम्यान सर्व गणेश मंडळांच्या अध्यक्षांचा सन्मान केला.

तसेच गणेशोत्सवात चोख बंदोबस्त ठेऊन तसेच सर्व गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करुन शांततेत उत्सव पार पाडल्याबद्दल मुस्लिम विकास परिषद, जिव्हाळा फाउंडेशन व मराठा सेवा संघ-संभाजी ब्रिगेडच्या वतीने शेरखान भाई, प्रा.मधुकर राळेभात, विठ्ठल राऊत, नगरसेवक दिगंबर चव्हाण, अवधुत पवार, संभाजी ढोले, पवन रोडे यांच्या वतीने जामखेड पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांचा सन्मान केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)