जामखेडच्या युवकाचा सायकलवर अजमेर प्रवास

सात दिवसात 1 हजार 110 किलोमीटर सायकल प्रवास

जामखेड प्रतिनिधी – जामखेड येथील सायकलपटु समीर शेख या युवकाने जामखेड ते अजमेर हा 1 हजार 110 किलोमीटरचा प्रवास सात दिवसात सायकलवर प्रवास पुर्ण करीत कोरोना जनजागृती केली या उपक्रमाचे कौतुक होत आहे

जामखेड येथील ओम हाॅस्पिटल मध्ये नोकरीस असलेला समिर शेख यांनी हे सायकलपटु असुन त्यानी अनेक वेळा लांबवर सायकलवर प्रवास केला आहे नववर्षाच्या स्वागत करण्यासाठी 1 जानेवारी 2021 रोजी जामखेड येथून अजमेर (राजस्थान) हा 1 हजार 110 किलोमीटर अंतराचा प्रवास सायकलवरून सुरू केला होता दरम्यान विविध ठिकाणी जाऊन कोरोना जनजागृती अभियानाअंतर्गत महाराष्ट्र , मध्यप्रदेश, आणि राजस्थान या राज्यातून प्रवास करत असताना कॉलेज ,शाळा , व लोकांची भेट घेऊन कोरोना या गंभीर आजाराविषयी माहिती व उपाय योजनांची माहिती देत आपण केलेल्या कोरोना सेंटर मधील कामाचा अनुभव लोकांपर्यंत पोहोचवण्याचे महत्त्वाचे काम पूर्ण केले.

सात दिवसात 1 हजार 110 किलोमीटर सायकल प्रवास अजमेर येथील ख्वाजा गरीब नवाज यांच्या दर्ग्यात जाऊन सायकल प्रवासाचा समारोप करण्यात आला तहसीलदार विशाल नाईकवाडे व पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी सायकल प्रवासास शुभेच्छापत्र देऊन तसेच जामखेड सायकलिंग क्लबच्या सर्व सदस्यांनी मार्गदर्शन करत शुभेच्छा दिल्या.

या प्रवासा दरम्यान सायकलिंग चे शरीरासाठी किती फायदे आहेत तसेच नियमितपणे व्यायाम उत्तम आहाराच्या जोरावर आपण कोणतेही आजाराला हरवू शकतो व कोणतेही ध्येय पूर्ण करू शकतो हे या युवकाने दाखवून दिले सर्व जामखेड परिसरातून या युवकाचे कौतुक केले जात आहे

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.