नगरपरिषदेकडून कारवाईला सुरुवात
जामखेड (प्रतिनिधी) : गेल्या तीन महिन्यानंतर आज जामखेड शहरात कोरोनाचे तीन पॉझिटिव्ह रुग्ण सापडले असतानाही शहरात मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली असून नागरिकांना कोरोनाचे गांभीर्य दिसत नाही. जामखेड नागरपरिषदेने रुग्ण सापडताच रस्त्यावर येऊन कारवाई करण्यास सुरुवात केली असतानाही गर्दी कमी होण्याचे नाव घेत नव्हती, त्यामुळे जामखेडकरांचा बेफिकीरीपणा नडणार असल्याचे दिसत आहे. प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने शारिरीक अंतराचा(सोशल डिटन्सं) फज्जा उडत आहे. शहरासह तालुक्यातील कोरोना बाधितांची संख्या 6 झाली आहे.
आज शहरातील ३ जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले असून यामध्ये खासगी हॉस्पिटल मधील एक डॉक्टर हे पुणे येथे आपल्या अजारी कुटुंबातील व्यक्तीला भेटण्यासाठी गेले होते. यानंतर ते काही दिवसांनी जामखेड शहरात आले होते. त्यांना त्रास होऊ लागल्याने त्यांनी नगर येथील खाजगी लॅबमध्ये कोरोनाची तपासणी केली होती. तर शहरातील बीड रोडवर रहाणार्या एका व्यक्ती आजारी असल्याने त्या व्यक्तीने देखील नगर येथील खासगी लॅबमध्ये तपासणी केली होती. तर शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या गोरोबा टॉकीज परिसरातील एक जण असे ३ जणांचा अहवाल आज दि. 29 रोजी पॉझिटिव्ह आले असून हे तिन्ही व्यक्ती शहरात रहात आहेत.
रुग्ण आढळूनही शहरातील बाजारपेठ सुरूच होती, त्यामुळे नागरपरिषदेचे मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते यांनी तात्काळ नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्या समवेत बिना मास्क व दुचाकी वाहनांवर डब्बल सीट प्रवास कारण्याऱ्यांवर कारवाई करण्यास सुरुवात केली. तरीही शहरातील दुकाने मोठ्या प्रमाणावर चालू होती. त्यामुळे आज ३ जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले असतानाही नागरिकांना कोरोनाचे गांभीर्य दिसत नाही. पाचची वेळ संपल्यावरही खरेदीसाठी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात नागरिक गर्दी करत आहेत. भाजीपाला, किराणा, फळ घेण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत. खर्डा चौक,जयहिंद चौक, बीड रोड, मेन पेठ, खर्डा रोड, नगर रोड बाजारतळ या भागात नागरीकांच्या गर्दीमुळे वाहतूक कोंडी होत आहे. आरोग्याच्या दृष्टीने ही बाब अतिशय धोकादायक आहे. शहर पालिकेने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.