जामखेड : शहरासह तालुक्यात एकाच दिवशी 16 कोरोना बाधित

जामखेड (प्रतिनिधी) : जामखेड तालुक्यात कोरोनाची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट झाली असून आज केलेल्या 95 जणांच्या रॅपिड अँटिजेन तपासणीत 16 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले असून 79 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. बाधिता मध्ये जामखेड शहरात 07, राजुरी 08, साकत 1 असे एकुण 16 रुग्ण आढळून आले आहे. त्यामुळे जामखेडकरांनी विशेष काळजी घेण्याची गरज आहे.

जामखेड तालुक्यात कोरोना बाधिताची रूग्णांची संख्या 69 वर गेली असून नागरिकांकडून जामखेड शहरात जनता कर्फ्यू करण्याची मागणी होत आहे. दि 29 जुलै पासून जामखेड शहरातील ग्रामीण रुग्णालयात रॅपिड अँटिजेन तपासणी सुरू करण्यात आली आहे.

यामध्ये शहरासह ग्रामीण भागात रुग्णाची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. काल सापडलेल्या पाॅझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तींची तपासणी केली असता शहरातील कोर्ट रोडवरील एकच ठिकाणी चार जण पाॅझिटिव्ह आले आहे. त्यामुळे रुग्ण आढळून आलेला परिसर नगरपरिषदेने सील केला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.