नवी दिल्ली : सुधारित नागरिकत्व कायद्या (का) विरोधात दिल्लीतील जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठात घडलेल्या हिंसाचारात सहभागी झालेल्या 70 जणांची छायाचित्रे प्रकाशित करून त्यांची माहिती देण्याचे आवाहन दिल्ली पोलिसांनी केले आहे.
का कायदा विरोधात झालेल्या आंदोलनात दिल्लीत 15 डिसेंबर रोजी हिंसाचार उफाळला होता. त्यावेळी पोलिसांनी जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठात पोलिसांनी घुसून कारबाई केली होती. हा हिंसाचार पोलिसांनी घडवल्याचा आरोप करण्यात येत होता. या पार्श्वभूमीवर पोलिसांच्या या कर्यवाहीला महत्व प्राप्त झाले आहे.
दिल्लीच्या गुन्हे शाखेकडे या प्रकरणाचा तपास सोपवण्यात आला आहे. त्यांनी बुधवारी हिंसाचारात सहभागी झालेल्यांची छायाचित्रे प्रकाशित केली.