नवी दिल्ली : जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठात पोलिसांनी केलेल्या अत्याचाराचा निषेध देशभरातील विद्यापीठात होत आहेच. मात्र आता तो ऑक्सफर्ड, हार्वर्ड, येल आणि एमआयटी अशा नामवंत विद्यापीठातही या हल्ल्याचा निषेध केला जात आहे.
अमेरिकेच्या वेगवेगळ्या विद्यापीठातील सुमारे 400 बुध्दीवंत विद्यार्थ्यांनी एक निवेदन प्रसिध्दीस दिले आहेत. त्यात जामिया आणि अलिगढ विद्यापीठात विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेल्या हल्ल्यामुळे भारतीय घटनेचे आणि आंतरराष्ट्रीय मनावाधिकाराचे ऊल्लंघन झाल्याचे म्हटले आहे.
इंग्लंडमध्ये ऑक्सफर्ड विद्यापठातील विद्यार्थ्यांनी इंडिया हाऊसवर मोर्चा काढून का कायदा आणि विद्यार्थ्यांवरील अत्याचाराचा निषेध करण्यात आला. या निषेध मोर्चाचे आयोजन येथे शिकणाऱ्या बहुतांश भारतीय विद्यार्थ्यांनी केले. हार्वर्ड विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी भारत सरकारला खुले पत्र लिहून हा कायदा मागे घेण्याची मागणी केली आहे. पोलिसांच्या निर्घृणतेने आम्हाला तीव्र धक्का बसला आहे. या मुळे मानवी अधिकाराचे उल्लंघन झाले आहे.
कोलंबिया विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी आंदोलना सहानुभूती व्यक्त करणारे पत्र जारी केले आहे. षमआयटीतीलम विद्यार्थ्यांनी अशा आंदोलनाला पाठींबा व्यक्त करणारे निवेदन जारी केले आहे. तिथे निदर्शने करण्यात आली. त्यावेळी विद्यार्थ्यांनी हातात, मेरी क्राईसेस आणि हॅपी न्यू फिअर असे लिहलेले फलक लावले होते.