जामिया विद्यापीठ ५ जानेवरपर्यंत बंद

राष्ट्रीयत्व सुधारण कायद्यामुळे देशात वादळ उठले आहे. आसाम, पश्‍चिम बंगाल आणि ईशान्य भारतात हिंसाचार उफाळला असून या कायद्याच्या विरोधात पडसाद देशाची राजधानी दिल्लीतही उमटले आहेत.

जामिया मिलिया विद्यापीठात या कायद्याचा जोरदार विरोध होत आहे. विद्यापीठ प्रशासनाने तणावपूर्ण परिस्थिती पाहता ५ जानेवारीपर्यंत सुट्टी जाहीर केली आहे. विद्यापीठातील सर्व परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. पश्चिम बंगालमध्ये आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे.

आंदोलनकर्त्यांनी रेल्वे स्थानकाला आग आगीच्या हवाली केले आहे. रस्ते, लोहमार्ग वाहतूक पूर्णपणे बंद आहे. विद्यार्थ्यांनी जामिया मिलिया विद्यापीठ बंद ठेवण्याचे आवाहन केले होते. शुक्रवारी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाने हिंसक वळण घेतले होते. विद्यार्थ्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रूधाराच्या नळकांड्या फोडल्या होत्या.

 

Leave A Reply

Your email address will not be published.