नवी दिल्ली : जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठाजवळ सुधारीत नागरीकत्व कायद्याच्या विरोधात (का) सुरू असणाऱ्या निदर्शनासमोर जाऊन मी तुम्हाला आझादी देतो असे सांगत गोळीबार करणाऱ्या तरूणाने या हल्ल्याआधी फेसबुक लाईव्ह केल्याचे निष्पन्न झाले आहे.
जामिया भागातून मोर्चा काढून का कायद्याचा निषेध करण्यात येत होते. त्यावेळी या तरूणाने पिस्तूल काढत पोलिसांच्या समर्थनाच्या घोषणा दिल्या. त्यानंतर मै देता हू आजादी असे म्हणत गोळीबार केला. ही गोळी शाबाद नावाच्या विद्यार्थ्याच्या हाताला लागली.
या विद्यार्थ्याला सहकारी निदर्शकांनी तातडीने रूग्णालयात हालवले. त्यानंतर पोलिसांनी या हल्लेखोर तरूणाला ताब्यात घेतले. त्याची चौकशी सुरूआहे. या हल्ल्यामुळे पुन्हा एकदा दिल्ली पोलिस टीकेचे धनी ठरले आहेत.