अँडरसनची क्रमवारीत झेप

दुबई – पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी मालिकेत सातत्यपूर्ण कामगिरी करत 600 कसोटी बळींचा टप्पा गाठणारा इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन याने आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत गोलंदाजांच्या यादीत झेप घेतली आहे. दोन वर्षांनंतर तो प्रथमच या क्रमवारीत पहिल्या 10 खेळाडूंमध्ये आला आहे. 14 व्या स्थानावरून तो आता 6 व्या स्थानावर आला आहे.

फलंदाजांच्या यादीत इंग्लंडच्या बेन स्टोक्‍सची एका स्थानाने घसरण झाली आहे. या क्रमवारीत तो आता 8 व्या स्थानावर असून भारताचा चेतेश्‍वर पुजारा 7 व्या स्थानावर आहे. भारताचा कर्णधार विराट कोहली फलंदाजांच्या क्रमवारीत आपले दुसरे स्थान राखून आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.